Posts

Showing posts from July, 2022

आपला शेतकरी

Image
आपला शेतकरी जे दिवसभर शेतात राबराब राबतात. पोटाची खळगी भरन्यासाठी जीवाच रान करतात, उन पावसाशी  झगड तात,असा आपला शेतकरी. दिवसरात्र शेतात कष्ट करुन आपल्याला अन्न पूरवतात.  पण,  पैशाच्या अभावी रात्री मात्र उपाशी पोटीच झोपतात, असा आपला शेतकरी.  पिके हीच त्याची संपत्ती असते. ती हसली तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते. तो मुलांप्रमाणे  त्यांची  काळजी घेतो, असा आपला शेतकरी.  जेव्हा त्याला सर्वत्र पिके दिसतात तेव्हा तो हसतो. नेहमी कर्जाच्या ओझ्याखाली असतो. दुष्काळामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. तरीही स्वत:ला सावरतो खंबीर उभा राहतो, असा आपला शेतकरी.  कठीण परिस्थितीत कठोर परिश्रम करतात आणि कठोर परिश्रम करून चांगली परिस्थिती निर्माण करतात, असा आपला शेतकरी.           कवी निखील नंदकिशोर जोशी